विद्या प्रतिष्ठानमध्ये अँड्रॉइड कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्या प्रतिष्ठानमध्ये
अँड्रॉइड कार्यशाळा
विद्या प्रतिष्ठानमध्ये अँड्रॉइड कार्यशाळा

विद्या प्रतिष्ठानमध्ये अँड्रॉइड कार्यशाळा

sakal_logo
By

बारामती, ता. १८ ः येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील बीबीए (सीए) विभागाने अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.


कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महेश पवार यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयामार्फत जे विद्यार्थीपूरक उपक्रम राबविले जातात, त्यात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी व आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यशाळेस राहुल शहा यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. अँड्रॉइड ॲप विकसनासाठी लागणाऱ्या बाबी प्रात्यक्षिकासह विशद केल्या.

ऋतुजा जगताप, आकाश मोरे, अनुष्का सावंत व बोराटे कोमल या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. भरत शिंदे, राहुल शहा, गजानन जोशी, महेश पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद यांचे सहकार्य लाभले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल शिंदे, अक्षय शिंदे, अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर व सतीश चौधर यांनी परिश्रम घेतले.
अनिल काळोखे यांनी समन्वय, सलमा शेख यांनी सूत्रसंचालन केले.
-------------------------