Thur, March 23, 2023

एसटीच्या सवलतींचे महिलांकडून स्वागत
एसटीच्या सवलतींचे महिलांकडून स्वागत
Published on : 17 March 2023, 3:39 am
बारामती, ता. १७ : राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसमधून तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देण्यास शुक्रवारपासून प्रारंभ झाला. सर्व महिलांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या (यामध्ये साधी, मिनी, विना वातानुकूलित, शयन आसन, शिवशाही, शिवनेरी, शिवाई, इतर सर्व) बसेस मध्ये ही सवलत लागू होणार आहे. महिला सन्मान योजना अशा नावाने ही योजना संबोधण्यात येते. या योजनेचे जिल्ह्यातील महिलांनी स्वागत केले.