बारामतीत साठ महिलांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत साठ महिलांचा सत्कार
बारामतीत साठ महिलांचा सत्कार

बारामतीत साठ महिलांचा सत्कार

sakal_logo
By

बारामती, ता. १८ : येथील टीसी महाविद्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंचक्रोशीतील साठ यशस्वी महिलांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ. सीमा नाईक गोसावी होत्या.

यावेळी राजकीय, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार, पोलिस, प्राध्यापक, कला, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिला, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तसेच सेविका यांना गौरविले.

प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी या प्रसंगी यशस्वी महिलांबद्दल गौरवोद्गार काढले. विद्या प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. नीलिमा गुजर, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. डॉ. विनायक लष्कर, राजू पांडे, संजय शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.सौ.सीमा नाईक-गोसावी व सुषमा संगई यांनी केले.