Sun, May 28, 2023

बारामतीत लिंगायत समाजाची आढावा बैठक
बारामतीत लिंगायत समाजाची आढावा बैठक
Published on : 20 March 2023, 3:30 am
बारामती, ता. २० : येथील महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सवानिमित्त सर्व लिंगायत समाजाची आढावा बैठक वीरशैव मंगल कार्यालय येथे झाली. या बैठकीमध्ये वीरशैव लिंगायत समाज ट्रस्टच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समिती स्थापन केली.
या समितीत रोहित पिल्ले, सचिन शाहीर, अभिषेक ढोले, ऋषिकेश भुंजे, मंदार कळसकर, ओंकार खोचरे, अमित ढोले, कीर्ती हिंगाने, अर्चना सुरवडे, जयश्री भुंजे, सुनीता ओझर्डे, कल्पना गवसणे, जयश्री गारुळे, वैष्णवी गारुळे, स्वप्नील भिले, विजय गाढवे, श्रीकांत निलाखे यांची निवड केली. महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्त विविध उपक्रम आयोजित करण्याचेही यात सर्वानुमते निश्चित केले गेले.