Wed, June 7, 2023

बारामती येथे विद्यार्थीनींना मार्गदर्शन
बारामती येथे विद्यार्थीनींना मार्गदर्शन
Published on : 24 March 2023, 10:04 am
बारामती, ता. २४ : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थींनींसाठी गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने डिजिटल इक्वलाझर स्किल्स या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेमध्ये आंतरराष्ट्रीय आयटी ऑडिटर स्वस्ती खंडाळे या विद्यार्थींनींना मार्गदर्शन करीत आहेत. इमेज कन्सल्टंट, मास्टर ट्रेनर म्हणूनही त्यांनी आतापर्यंत नऊ हजार मुलींना प्रशिक्षण दिले आहे.
याप्रसंगी नीलीमा पेंढारकर यांनी प्रास्ताविक केले. जीवन जगण्यासाठी डिजिटल स्किल्स असणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी केले. या कार्यशाळेला उपप्राचार्य डॉ.श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद, समन्वयक डॉ. अमरजा भोसले, सुजाता पाटील आदी उपस्थित होते.