जलतरण स्पर्धेमध्ये साळुंके यांना सुवर्णपदक

जलतरण स्पर्धेमध्ये साळुंके यांना सुवर्णपदक

बारामती, ता. २८ : नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत श्रायबर डायनामिक्स कंपनीचे कर्मचारी महेश साळुंके यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल व १०० मीटर फ्रीस्टाईल या प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकविला तर २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये त्यांनी रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राचे सचिव बाळू चव्हाण तसेच नाशिक जलतरणचे अध्यक्ष निंबाते यांच्या हस्ते त्यांचा पदक देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी त्यांना श्रायबरचे जितेंद्र जाधव, मंजुश्री चव्हाण, हनुमंत जगताप, कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांनी सहकार्य केले.
येत्या १ ते ११ ऑगस्टमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कंपनी त्यांना सहकार्य करणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले. राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केल्याने डायनामिक्स प्रशासनानेही आनंद व्यक्त केला.

07104

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com