बारामतीत खुनाच्या प्रयत्नातील दोघांना अटक

बारामतीत खुनाच्या प्रयत्नातील दोघांना अटक

बारामती, ता. २३ ः प्रेमसंबंध संपवत नसल्याच्या कारणावरून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. देशमुख चौकात अभिषेक प्रकाश वणवे (रा. पतंगशानगर, बारामती) या युवकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गौरव राकेश वर्मा व गणेश सुभाष गरगटे (दोघेही रा. श्रावण गल्ली, बारामती) या दोघांना पोलिसांनी शोधून काढून अटक केली. चाकूने वार करून हे दोघे घटनास्थळावरून फरारी झाले होते. 15 एप्रिल रोजी ही घटना घडली होती.
पोलिसांनी या प्रकरणात कट रचणे व खूनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी अभिषेक वणवे हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला पुण्याला उपचारार्थ हलविण्यात आले होते. या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर पुढील तपास करीत आहेत. यातील गंभीर जखमी युवकावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून रुग्णालयात तो उपचार घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com