बारामती युवकाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती युवकाकडून
पिस्तूल, काडतुसे जप्त
बारामती युवकाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

बारामती युवकाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

sakal_logo
By

बारामती, ता. २६ : येथील शहर पोलिसांनी गुप्त माहितीवरून एका युवकाकडून गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली.
पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांना गुनवडी परिसरात एम.एच. ४२ बी.एच. ५४७३ या गाडीवरील युवकाकडे दोन दिवसांपासून गावठी पिस्तूल असून, तो विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. महाडीक यांनी पोलिस उपनिरीक्षक संध्या देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांच्यासह तपास पथकातील तुषार चव्हाण, दशरथ कोळेकर, दशरथ इंगोले, अजय सीताप, शाहू राणे, कल्याण खांडेकर यांना कारवाईच्या सूचना केल्या.
संशयित गाडी गुनवडी येथे नदीच्या जवळ थांबवून पोलिसांनी चालक विक्रम शरद माने (वय २३, रा. गुनवडी, ता. बारामती) याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याच्याकडून गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. सदर आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. संबंधित आरोपीकडून पोलिस आणखी माहिती घेत असून, तपास करीत आहेत.
पिस्तूलाबाबत ज्या नागरिकांना माहिती असेल, त्यांनी पोलिसांना ही माहिती द्यावी, त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन केले आहे.