बारामतीत मटका अड्ड्यावर कारवाई

बारामतीत मटका अड्ड्यावर कारवाई

बारामती, ता. २७ : शहरातील पानगल्लीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत मटका चालविणाऱ्या तिघांसह मटका खेळण्यास आलेले सात, अशा १० जणांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रोकड व इतर साहित्यासह ११ हजारांचा ऐवज जप्त केला गेला.
याबाबत पोलिस कर्मचारी मयूर गायकवाड यांनी फिर्याद दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी पंचांसह येथे छापा टाकला. त्या वेळी हाजीलाल शेख, महादेव रणदिवे आणि अशोक धुमाळ हे तिघे पानगल्ली येथे दुकानाच्या आडोशाला कल्याण मटका खेळवत असल्याचे दिसून आले. या वेळी तेथे मटका जुगार खेळण्यासाठी आलेल्या अन्य सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आठ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com