सरकारी कामात अडथळा 
आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

बारामती, ता. २८ ः बेकायदा माती उपसा करून तो डंपरमधून भरून घेऊन जाताना महसूलच्या अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करूनही वाहन पुढे नेत मोकळ्या जागेत माती ओतून देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तलाठी विद्या सदानंद जगताप (रा. पणदरे, ता. बारामती) यांच्या फिर्यादीवरून आकाश कल्याण गावडे, महेश गावडे (रा. गुणवडी, ता. बारामती) व डंपर चालक बाळू पवार (रा. सोनगाव, ता. बारामती) (पूर्ण नावे नाहीत) यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, तहसीलदारांच्या सूचनेनुसार तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना न जुमानता डंपर वेगाने पुढे नेला, वारंवार सूचना देऊनही तो थांबविला नाही, बारामतीकडे हा डंपर नेला. नेताना उलट दमदाटी केली, फिर्यादींनी माळेगावच्या मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे यांच्याकडे मदत मागितली. तुम्ही पाठलाग करत असलेल्या डंपरमधील मातीची रॉयल्टी भरल्याच्या पावत्या असल्याचे आकाश गावडे यांनी फिर्यादीला सांगितले. प्रत्यक्षात त्यांच्याकडील कागदपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा डंपर तहसिल कचेरीकडे नेण्यास सांगितल्यावर, वाहन ताब्यात देणार नाही, करायचे ते करा असे म्हणत डंपर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत नेला. तुमच्याकडे योग्य ती कागदपत्रे नाहीत, तुम्ही वाहन तहसील कार्यालयात घ्या, असे सांगूनही माती टाकून ट्रक पळविण्याचा प्रयत्न केला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com