माजी सैनिकांचे शासकीय प्रश्‍न मार्गी लावू

माजी सैनिकांचे शासकीय प्रश्‍न मार्गी लावू

बारामती, ता. ६ : ''माजी सैनिकांचे शासकीय पातळीवर असणारे प्रश्न मार्गी लावून जिल्ह्यात फिरते कॅंटीन, रुग्णालये हे प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे. यासाठी नियमीत बैठका घेऊ,'' अशी ग्वाही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस. डी. हंगे यांनी बारामतीत दिली.
बारामती येथे माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजना, निवृत्ती वेतनाची थकीत प्रकरणे, शौर्यपदक धारक वीर पत्नी व सैनिकांची जमीन अतिक्रमण प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित शासनाच्या आदेशानुसार बारामती तहसीलदार कार्यालयात आज (ता. ६) बैठक पार पडली.
बारामतीमधील रुग्णालयात सैनिकांसाठी असलेल्या योजना वापरात येत नसल्याची तक्रार तसेच सी. एस. डी. कॅंटीन नसल्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे कर्नल हंगे यानी सांगितले. सुभेदार शेळके यांनी बचत गटाच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.
जमिनीसंबंधातील तक्रारीच्या फाईल्स तहसीलदार गणेश शिंदे यांनी जमा करून घेत प्रत्यक्ष भेट देत मार्गी लावू असे आश्वासन दिले.
दरम्यान, हनुमंत निंबाळकर,अनिल शिंदे, ॲड गणेश आळंदीकर यांनी कामाचा आढावा आढावा घेतला.
यावेळी सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार शेळके, बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ सोमेश्वर नगरचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष ॲड. गणेश आळंदीकर, सैनिक महाउद्योगचे संस्थापक अनिल शिंदे, प्रशांत लकडे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, बचत गटाच्या अध्यक्षा वर्षा शिंदे तसेच आजी, माजी सैनिक उपस्थित होते.

07294

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com