Mon, Sept 25, 2023

बारामतीत एकावर
विनयभंगाचा गुन्हा
बारामतीत एकावर विनयभंगाचा गुन्हा
Published on : 6 May 2023, 1:23 am
बारामती, ता. ६ ः शहरातील सहयोग सोसायटीसमोर एका युवतीला अडवून तिचा हात धरुन तिला खाली पाडून, फरफटत नेत लग्नाची मागणी घालणाऱ्या युवकाविरुध्द शहर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (ता. ६) सकाळी ही घटना घडली.
या प्रकरणी संबंधित युवतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अरफाज सादिक आत्तार (रा. कोष्टी गल्ली, बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित युवतीचा हात पकडून तिला खाली पाडून फरफटत नेण्याचा प्रकार घडला. या बाबत सहायक पोलिस निरिक्षक प्रकास वाघमारे पुढील तपास करीत आहेत.