बारामतीत लडकत अकादमीच्या वतीने विद्यार्थ्यांना मदतीचा हात

बारामतीत लडकत अकादमीच्या वतीने विद्यार्थ्यांना मदतीचा हात

बारामती, ता. ८ : विद्या प्रतिष्ठानमधील परिक्षा केंद्रात नीटच्या परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बारामतीच्या लडकत सायन्स अँकेडमीच्या वतीने पाण्याची बाटली देऊन सहाय्य करण्यात आले. राज्यातील दोन लाख ७७ हजार विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी नावनोंदणी केलेली होती. या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून विद्यार्थी परिक्षेसाठी आले होते. दरम्यान येणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या मदतीसाठी लडकत सायन्स अकादमीने मदत कक्ष उभारून त्यांना मदतीचा हात दिला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याला पाण्याची बाटली दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसन केले. या प्रसंगी संचालक नामदेव लडकत, गणेश लडकत, प्रफुल्ल आखाडे, शरद वाघमारे, संतोष शिंदे, महादेव कोळी आदींनी उपक्रमात सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com