बारामतीत हमीभावाने १०२५ क्विंटल हरभरा खरेदी

बारामतीत हमीभावाने १०२५ क्विंटल हरभरा खरेदी

बारामती, ता. ८ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘नाफेड’मार्फत मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हमी दरानुसार १०१ शेतकऱ्यांचा १०२५ क्विंटल हरभरा खरेदी केला.
‘नाफेड’मार्फत सब एजंट म्हणून नीरा कॅनॉल संघ यांनी सहकार्य केले. या हरभरा केंद्राची मुदत आता संपली असल्याची माहिती प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी दिली. या केंद्रावर प्रतिक्विंटल ५३३५ रुपये या हमीदराने हरभरा खरेदी केली गेली. या हरभऱ्याची किंमत ५४ लाख ६८ हजार रुपये इतकी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. हमीदरापेक्षा बाजार आवारातील हरभऱ्याचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांना या केंद्राचा आर्थिक फायदा झाला. शासनाने सदर खरेदी केंद्राची नोंदणी मुदत वाढवून पुन्हा खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याचे सचिव जगताप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com