‘विद्या प्रतिष्ठान’ची निकालाची परंपरा कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विद्या प्रतिष्ठान’ची निकालाची परंपरा कायम
‘विद्या प्रतिष्ठान’ची निकालाची परंपरा कायम

‘विद्या प्रतिष्ठान’ची निकालाची परंपरा कायम

sakal_logo
By

बारामती, ता. १३ ः येथील विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम शाळेच्या इयत्ता दहावीचा सीबीएससी बोर्डाचा शंभर टक्के निकाल जाहीर झाला आहे. शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी मराठी विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले. तर २१ विद्यार्थ्यांना संस्कृत या विषयात शंभर पैकी शंभर, तीन जणांना गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पंधरा विद्यार्थ्यांनी शंभर पैकी १०० गुण प्राप्त केले.
मंदार राजमाने (९८. ५०), समीरा शहा व अदिती बोराडे (९७. ३३), श्रावणी शिंगाडे या विद्यार्थिनींनी (९७.१७) गुण प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले. तसेच १२ वी ह्युमॅनिटीज (कला), वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखेचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही १०० टक्के लागल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या राधा कोरे यांनी आनंद व्यक्त केला.
ह्युमॅनिटीज (कला) विभागात देवांगराज साहू, नंदिनी गांधी, समीक्षा थोरात, निनाद कडबे, बादल कुमार, समृद्धी मत्रे, सृष्टी भापकर, सानिया साळवे, मानवी साईनी या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली.