अभ्यासक्रमाशिवाय थोरांच्या यशोगाथा शिकवाव्या : कोलते

अभ्यासक्रमाशिवाय थोरांच्या यशोगाथा शिकवाव्या : कोलते

बारामती, ता. १५ : शालेय विद्यार्थ्यांना गुणांसाठी शिक्षण देण्यासोबतच संस्कार शिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी शालेय अभ्यासक्रमाशिवाय थोरा-मोठ्यांच्या यशोगाथा शिकवाव्यात असा निर्णय संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण या संस्थेच्या सभेत घेण्यात आला.
बारामतीच्या शाहू हायस्कूलमध्ये झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते होते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, स्वामी विवेकानंद, साने गुरुजी, रवींद्रनाथ टागोर, शेक्सपिअर यांसारख्या यशोगाथा वर्षभरात विद्यालयातून शिकवण्यात येणार आहेत, अशी असल्याची माहिती विजय कोलते यांनी दिली.
संच मान्यतेसाठी विद्यार्थी आधार वैद्यता पूर्ण करण्यासाठी सोमवार (ता. १५) पर्यंतची मुदत दिली आहे. अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, तर काही विद्यार्थ्यांचे आधार वैध नाही. यामुळे विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक पदांच्या मंजुरीवर परिणाम होऊ शकतो. या बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
तसेच उच्च माध्यमिक विभागाची संच मान्यता अजूनही झालेली नसल्याने ती अगोदर पूर्ण करण्यात यावी. रोस्टर तपासणीची कालमर्यादा ३० जून असल्याने आयुक्त कार्यालय, पुणे विभाग पुणे, मागासवर्गीय कक्ष या कार्यालयास युद्ध पातळीवर संस्थांकडून आलेले प्रस्ताव विना विलंब तपासून निकाली काढण्यासाठी सूचना देण्यात याव्यात या बाबतही बैठकीत चर्चा झाली.
या वेळी ब्राह्मणोती शिक्षण संस्था जुन्नरचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह अनिल मेहेर, विभागीय अध्यक्ष अप्पासाहेब बालवडकर, संस्थाचालक मंडळाचे संचालक गुरुमुख नारंग, सतीश खोमणे, शांताराम पोमण, विलास पाटील, वीरसिंह रणसिंग, शाहू विद्यालयाचे पर्यवेक्षक सुतार, के. टी. जाधव, काशिनाथ सोनलकर उपस्थित होते. सचिव शिवाजी घोगरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com