दोन गावठी बनावटीची पिस्तुले बारामतीत जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन गावठी बनावटीची 
पिस्तुले बारामतीत जप्त
दोन गावठी बनावटीची पिस्तुले बारामतीत जप्त

दोन गावठी बनावटीची पिस्तुले बारामतीत जप्त

sakal_logo
By

बारामती, ता. १४ ः बेकायदा गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (ता. १३) बारामती ते भवानीनगर रस्त्यावरील उड्डाणपुलाखालील बाजूस दोन संशयितांकडे पिस्तूल असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत आकाश ऊर्फ अक्षय संतोष खोमणे (रा. चिखली, वंजारवस्ती, ता. इंदापूर) व सोमनाथ ज्योतिराम खुरंगे (रा. रोहि पाटील मारुती मंदिराजवळ, बारामती) यांच्याकडे गावठी बनावटीचे अंदाजे ३५ हजार रुपये किमतीची दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान या पिस्तुलाची विक्री त्यांना ऋषीकेश नितीन सावंत (रा. जाचकवस्ती, लासुर्णे ता. इंदापूर) याने केल्याचे सांगितल्यावरून त्याच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी स्वप्नील मदन अहिवळे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी फौजदार लेंडवे अधिक तपास करीत आहेत.