बारामतीत डॉ. व्होरा करणार विनामूल्य उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत डॉ. व्होरा करणार विनामूल्य उपचार
बारामतीत डॉ. व्होरा करणार विनामूल्य उपचार

बारामतीत डॉ. व्होरा करणार विनामूल्य उपचार

sakal_logo
By

बारामती, ता. १५ : प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संजय व्होरा येत्या शनिवारी (ता. २०) बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात येणार आहेत. मेंदू व मणक्यांबाबत ज्यांच्या तक्रारी असतील अशा रुग्णांनी शनिवारी सकाळी दहा वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी येण्याचे आवाहन केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी या बाबत माहिती दिली.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत डॉ. संजय व्होरा यांनी बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध वैद्यकीय व्यावसायिकांना आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील रुग्णांवर विनामूल्य उपचारांसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. व्होरा दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी बारामतीच्या महाविद्यालयात रुग्णावर उपचारासाठी येणार आहेत.
मेंदू व मणक्याच्या आजाराने त्रस्त रुग्णांवर ते उपचार करणार आहेत. त्यांच्यासमवेत ससून रुग्णालयातील डॉक्टर्सही येणार आहेत. येथे नावनोंदणीची गरज नसून रुग्णांनी थेट शनिवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.