बारामती बाजार समितीच्या सभापतिपदी सुनील पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती बाजार समितीच्या 
सभापतिपदी सुनील पवार
बारामती बाजार समितीच्या सभापतिपदी सुनील पवार

बारामती बाजार समितीच्या सभापतिपदी सुनील पवार

sakal_logo
By

बारामती, ता. १६ : येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी सुनील वसंतराव पवार (माळेगाव खुर्द) यांची; तर उपसभापतिपदी नीलेश भगवान लडकत (शेरेवाडी बाबुर्डी) यांची बिनविरोध निवड झाली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीसाठी मंगळवारी (ता. १६) नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार सभापतिपदासाठी सुनील पवार; तर उपसभापतिपदासाठी नीलेश लडकत या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे अजित पवार यांनी सभापती व उपसभापतिपदाची नावे देऊ केली होती. त्यांच्या सूचनेनुसार या दोन पदांसाठी दोनच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, धनवानवदक, संदिपजी जगताप, बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रेय आवळे, लक्ष्मण मोरे, नारायणराव कोळेकर, तुषार कोकरे, सुनील बनसोडे, दिलीप परकाळे, विलास कदम, संभाजी किर्वे, सूर्यकांत गादिया व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.