उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बारामतीतील कामांचा आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपविभागीय अधिकाऱ्यांकडून
बारामतीतील कामांचा आढावा
उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बारामतीतील कामांचा आढावा

उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बारामतीतील कामांचा आढावा

sakal_logo
By

बारामती, ता. १६ : तालुक्यातील विविध शासकीय विभागांमधील महत्त्वाच्या कामांचा आढावा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी सोमवारी (ता. १५) घेतला.
नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत विविध विषय वेगाने मार्गी लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, माळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे, महाऊर्जाचे विशाल सावंत, उपअभियंता सुभाष पाटील, विजयानंद पेटकर, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, उप अधीक्षक भूमी अभिलेख सोमनाथ कुभांर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बारामती शहरातील सर्व शासकीय कार्यालये, उद्याने, क्रीडांगणे, बाजार समिती, भाजी मार्केट, रुग्णालये, पोलिस ठाणी, चौक्या, मैदाने, विश्रामगृहे, महापुरुषांचे पुतळे आदी ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करावेत, असे निर्देश नावडकर यांनी दिले.
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे, नळ जोडणी व सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वृक्षारोपणासाठी सर्व शासकीय कार्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
बारामती येथील विविध विभागांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांची सादरीकरणाद्वारे माहिती घेतली. सर्व विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा. विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी खास प्रयत्न करावेत. निधीची मागणी असल्यास प्रस्ताव सादर करावेत. सर्व विभागांनी समन्वयांनी कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.