लडकत सायन्स ॲकॅडमीला
‘जेईई मेन्स’मध्ये यश

लडकत सायन्स ॲकॅडमीला ‘जेईई मेन्स’मध्ये यश

बारामती, ता. १७ ः शहरातील लडकत सायन्स ॲकॅडमीचे विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेत पात्र झाले असून ॲकॅडमीने आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
विवेक ढगे व असिक अली रंगरेज या विद्यार्थ्यांनी ९८ पर्सनटाईल मार्क्स मिळवत अव्वल स्थान मिळवले, विवेक ढगे यास गणित विषयामध्ये ९९.५२ पर्सनटाईल मिळाले.
ॲकॅडमीमध्ये ९० पर्सनटाईल पुढे ०५ विद्यार्थी, ७५ टक्क्यांहून अधिक २५ विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले. सिद्धी देशमुख हिस ९६.३७, श्रेया धायतोंडे हिस ९५.३६, सुमित पाटील ९४.९८ पर्सनटाईल मार्कस मिळाले आहेत.
ॲकॅडमीचे संचालक नामदेव लडकत व गणेश लडकत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुणवत्ता पाहून प्रवेश देत नाही तर प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थांमध्ये गुणवत्ता निर्माण करतो असे नामदेव लडकत यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले की, ॲकॅडमीमधील शिक्षकांनी अवघड विषय सोप्पा करून शिकविण्याच्या पद्धतीचा खूप फायदा झाला, लडकत सायन्स ॲकॅडमीमध्ये अद्यावत डिजिटल बोर्ड सहित एसी क्लास रूम आहेत, देशभरातून राजस्थान कोटा, लातूर, हैद्राबाद, पुणे येथील नामांकित संस्थेमधील तज्ञ व अनुभवी शिक्षक विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. उच्च दर्जाचे स्टडी मटेरिअल वापरले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com