बारामतीत भटक्या कुत्र्यांबाबत नगरपालिकेकडून उपाययोजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत भटक्या कुत्र्यांबाबत 
नगरपालिकेकडून उपाययोजना
बारामतीत भटक्या कुत्र्यांबाबत नगरपालिकेकडून उपाययोजना

बारामतीत भटक्या कुत्र्यांबाबत नगरपालिकेकडून उपाययोजना

sakal_logo
By

बारामती, ता. १७ : शहरातील साडेतीन वर्षांच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने आता भटक्या कुत्र्यांबाबत गांभीर्याने कारवाईस प्रारंभ केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी नगरपालिका प्रशासनाने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्या त्या प्रभागातील कुत्र्यांबाबतच्या तक्रारी संबंधित कर्मचारी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
प्रभाग क्रमांक एक ते सात दरम्यानच्या तक्रारींसाठी संजय गडीयाल (९५९५०८२०२०), प्रभाग क्रमांक आठ ते बारा व एकोणीस प्रभागासाठी रणजित अहिवळे (९९६०६६९५३६), प्रभाग क्रमांक तेरा ते अठरा साठी बळवंत झुंज (७६२०४०१३८३), तसेच बबलू कांबळे (८७८८६८८४८८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
शहरात अनेक प्रभागांसह उपनगरांमध्येही भटक्या कुत्र्यांची समस्या मोठी आहे. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची नागरिकांची मागणी आहे. दोनदा लहान मुलांवर कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मुले जखमी झाल्यानंतर बारामतीत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. नगरपालिकेने लोकभावनेची दखल घेत याबाबत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या वर्षभरापासून नगरपरिषद टीम भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर काम करीत आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केंद्र उभारले असून, परवानगीनंतर तिथे काम सुरु करीत आहोत. तेथे आपण सीसीटीव्ही यंत्रणा उभारणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. काहीजण रस्त्यावर अनेकदा अन्न टाकले जाते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढते आहे.
- महेश रोकडे, मुख्याधिकारी, बारामती नगर पालिका