बारामतीतील वेश्या व्यवसायावर कारवाई

बारामतीतील वेश्या व्यवसायावर कारवाई

बारामती, ता. २० : शहरातील हरिकृपानगर येथील सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत दोन महिलांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी युवराज रोहिदास बेंद्रे व शांतिलाल शिवाजी बेंद्रे (रा. कर्जत, जि. नगर) या दोघांवर गुन्हा दाखल केला.
हरीकृपानगरमधील एका अपार्टमेंटमधील सदनिकेत हा व्यवसाय केला जात होता. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांना सूचना करत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार महाडीक यांच्यासह उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे, कर्मचारी अक्षय सिताप, कल्याण खांडेकर, दशरथ जामदार आदींनी तेथे बोगस ग्राहक पाठवला. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी येथे कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी रोकड व मोबाईल जप्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com