काट्याचीवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी मारुती मासाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काट्याचीवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी मारुती मासाळ
काट्याचीवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी मारुती मासाळ

काट्याचीवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी मारुती मासाळ

sakal_logo
By

बारामती, ता. २३ : तालुक्यातील काटेवाडी येथील काट्याचीवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मारुती बाबूराव मासाळ यांची तर उपाध्यक्षपदी कुंडलिक केशव भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विद्यमान अध्यक्ष स्वप्नील विठ्ठल काटे व उपाध्यक्ष नितीन पांडुरंग माने यांनी आपल्यापदाचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या पदांवर ही निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार व बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज करण्यात येईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी नमूद केले. अमर गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. संस्थेचे सचिव बाळासाहेब जाधव यांनी या प्रक्रियेत मदत केली.
07403, 07404