बारामतीत बाल योग संस्कार शिबिर

बारामतीत बाल योग संस्कार शिबिर

बारामती, ता. २३ : येथील जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशनमार्फत लहान मुलांसाठी नुकतेच उन्हाळी बाल योग संस्कार शिबिर आयोजित केले गेले. जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिबिर पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप झाले.
या शिबिरामध्ये विविध प्रगत योगासने, समंत्र सूर्यनमस्कार, मेंदूला चालना देण्यासाठीच्या यौगिक हालचाली, यांचे प्रशिक्षण दिले. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेबद्दल जागृती व्हावी व भाषा सहज बोलता यावी, यासाठी संस्कृत संभाषण, विविध मंत्रपठण घेण्यात आले. योग महाविद्यालयाचे संचालक डॉ. भक्ती महाजन, डॉ. नीलेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिरानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी, स्वतःमधील विविध गुणांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही या शिबिराचे आयोजन केले होते. अनेक पालकांनी त्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे शिबिराच्या समन्वयक डॉ. भक्ती महाजन यांनी सांगितले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, योग महाविद्यालयाचे विद्यार्थी सचिन रणमोडे, अश्विनी वायसे, नंदिनी खोमणे यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com