बारामतीत वैयक्तिक शौचालयांसाठी 
अनुदानाची मुदत पाच जूनपर्यंत

बारामतीत वैयक्तिक शौचालयांसाठी अनुदानाची मुदत पाच जूनपर्यंत

बारामती, ता. २४ : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी ५ जूननंतर अनुदान उपलब्ध होणार नाही, त्यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी ५ जून तारखेपर्यंत बारामती नगर परिषदेत प्रस्ताव नगर परिषदेस सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय असणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय उपलब्ध नाही, अशा कुटुंबांचा शोध घेत त्यांना वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी अनुदान देण्याबाबत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाने निर्देश जारी केले आहेत.

ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नाही त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेद्वारे शासनाचे बारा हजार व नगर परिषदेच्या फंडातून प्रत्येक वैयक्तिक शौचालयासाठी पाच हजार असे एकूण १७ हजारांचे अनुदान प्राप्त होणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्याने भरायची आहे. अनुदानासाठी नगर परिषदेकडे घराची नोंद व जागा असल्याची खात्री द्यावी लागणार आहे. नगर परिषदेकडे या अनुदानाचे तब्बल ४० लाख रुपये उपलब्ध असून ३०० हून अधिक लाभार्थ्यांना या योजनेत अनुदान मिळू शकते, अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील अभिषेक लिंपी यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com