बारामतीत यंदाही मुलींनीच मारली बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत यंदाही मुलींनीच मारली बाजी
बारामतीत यंदाही मुलींनीच मारली बाजी

बारामतीत यंदाही मुलींनीच मारली बाजी

sakal_logo
By

बारामती, ता. २५ : इयत्ता बारावीचा बारामती तालुक्याचा निकाल ९५.२६ टक्के जाहीर झाला आहे.
निकाल यंदा उत्तम लागल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
बारामती तालुक्यात ७०३४ विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. या पैकी ६६९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी बाजी मारली असून, ९८.१० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तालुकdयात ३४३७ मुले या परिक्षेसाठी बसलेली होती. त्यापैकी ३१६६ उत्तीर्ण झाली असून, ही टक्केवारी ९२.११ इतकी आहे. तर, ३५९४ मुलींपैकी ३५२६ मुली उत्तीर्ण झाल्या. ही टककेवारी ९८.१० इतकी आहे.


महाविद्यालयनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती- ९२, एम. एस. काकडे ज्युनिअर कॉलेज सोमेश्वरनगर- ८७.१६, आर. एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट कनिष्ठ महाविद्यालय- ९९.१७, श्री शहाजी ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स सुपे- १००, श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती- ८९.८९, न्यू ज्युनियर कॉलेज, वडगाव निंबाळकर- ५६.६६, म.ए.सो. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती- ९०, शारदाबाई पवार विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शिवनगर- १००, श्री मयुरेश्वर विद्यालय व उच्च महाविद्यालय ९८.४६, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज वाणेवाडी- १००, नव महाराष्ट्र विद्यालय ज्युनियर कॉलेज पणदरे- ९१.०६, शारदाबाई पवार महाविद्यालय शारदानगर- ९९.६३, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सांगवी- ८९.२८, आनंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय होळ- ८६.२०, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय- बारामती ९४.४०, सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर- ९५.८३, उत्कर्ष जुनियर कॉलेज वाघळवाडी- ७४.५७, श्रीमंत शंभूसिंह महाराज ज्युनिअर कॉलेज माळेगाव- ५८.८२, कृषी उद्योग शिक्षण संस्था, काऱ्हाटी- ९८.५९, एस.व्ही.एम. अँड ज्युनिअर कॉलेज, भिकोबा नगर- १००, सद्गुरु शिक्षण मंडळ लोणी भापकर- १००, शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर- १००, श्री सिद्धेश्वर जुनियर कॉलेज कोऱ्हाळे बुद्रुक- ९७.५९, श्री सिद्धेश्वर हायस्कूल, को-हाळे बुद्रुक- १००, कै. जिजाबाई गावडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारवडी- ९८.४६, म. ए. सो. उच्च माध्यमिक विद्यालय- ८६.५३, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल- १००, धों. आ. सातव कारभारी विद्यालय बारामती- १००, शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय- १००, एस.पी.सी.टी.एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स- १००, क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज- १००, अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल संग्राम नगर- १००, अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पळशी- १००, आदित्य इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वंजारवाडी- १००, शारदाबाई पवार आयटीआय, शारदानगर- ८७.५०, मयुरेश्वर प्रा. आयटीआय खंडुखैरेवाडी, सुपे- १००, शासकीय आयटीआय- ९४.४४,

व्होकेशनल शाखांचा निकाल
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय- ८९.१८, मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर- ८६.११, आर.एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज- ८३.०१, श्री शहाजी उच्च माध्यमिक विद्यालय सुपे- ९७.८७, शारदाबाई पवार विद्यालय व जुनिअर कॉलेज शिवनगर- १००, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज वाणेवाडी- १००, नवमहाराष्ट्र विद्यालय व जुनिअर कॉलेज पणदरे- १००.