बारामतीच्या रुग्णालयात सुरक्षा रक्षकास मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीच्या रुग्णालयात
सुरक्षा रक्षकास मारहाण
बारामतीच्या रुग्णालयात सुरक्षा रक्षकास मारहाण

बारामतीच्या रुग्णालयात सुरक्षा रक्षकास मारहाण

sakal_logo
By

बारामती, ता. २६ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील सुरक्षा रक्षकास मारहाण करून गोंधळ घालणाऱ्या रसूल शरीफ शेख (रा. बारामती) याच्याविरूद्ध तालुका पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवाव्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी नारायण माणिक काळे यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (ता. २५) रुग्णालयात रसूल शेख हे केस पेपर काढण्यासाठी आलेले असताना शासकीय शुल्क म्हणून वीस रुपयांची मागणी केल्याचा राग मनात धरुन दमदाटी करून, अंगावर धावून येत मारहाण केली. टेबलवर असलेले केस पेपर फेकून देत शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.