बारामती येथे पालखी सोहळा नियोजनाच्या आढावा बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती येथे पालखी सोहळा 
नियोजनाच्या आढावा बैठक
बारामती येथे पालखी सोहळा नियोजनाच्या आढावा बैठक

बारामती येथे पालखी सोहळा नियोजनाच्या आढावा बैठक

sakal_logo
By

बारामती, ता. ३० : संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना आरोग्यविषयक सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिल्या.
बारामती, इंदापूर व दौंड या तालुक्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक यांच्या बैठकीचे मंगळवारी (ता. ३०) आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जगताप आदी उपस्थित होते.
नावडकर यांनी आरोग्य, महसूल, पोलिस, पंचायत समिती यांनी समन्वयाने काम करण्याविषयी सूचना देवून आपत्ती व्यवस्थापनात करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. हंकारे यांनी पालखी मार्गावरील पाणी उद्भवाचे शुद्धीकरण, हॉटेल पर्यवेक्षण, फिरती वैद्यकीय पथके, प्राथमिक स्तरावर दिल्या जाणाऱ्या बाह्यरुण, आंतररुग्ण सेवा, प्राथमिक आरोग्य स्तरावर उष्माघात कक्ष स्थापन करणे, अतिरिक्त मनुष्य बळ व टँकर पाणी भरणा केंद्राबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. ढेकळे यांनी पालखी काळात प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४तास अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्याच्या सूचना देवून किटकशास्त्रीय सर्वेक्षण, डासोउत्पत्ती स्थाने नष्ट करणे, फवारणी करण्याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. बागल यांनी ग्रामपंचायत समन्वयाने पालखी सोहळ्यापूर्वी व पालखी सोहळा पश्चात गावातील सार्वजनिक स्वच्छता व मेडिकल बायोवेस्ट विषयी सूचना दिल्या. प्रास्ताविक डॉ. खोमणे यांनी केले.