बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये कार्यशाळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये कार्यशाळा उत्साहात
बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये कार्यशाळा उत्साहात

बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये कार्यशाळा उत्साहात

sakal_logo
By

बारामती, ता. १ : विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या बीबीए (सीए) विभागाने द्रुपल, जुमला, अजॅक्स या प्रोग्रॅमिंग भाषेमधील विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेत थॉटपॅड इन्फोटेकचे संचालक शिरीष कडबाने यांनी मार्गदर्शन केले.
द्रुपल, जुमला अजॅक्स फ्रेमवर्कमध्ये मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करणे आणि ‘पीएचपी’ प्रोग्रामिंगबाबत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणे, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली. कडबाने यांनी कार्यशाळेत द्रुपल, जुमला अजॅक्सची प्रमुख वैशिष्ट्ये आणि प्रोग्रॅमिंग प्रकल्पांमध्ये त्यांचा प्रभावीपणे वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंग क्षेत्रातील त्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवण्यासाठी अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही महेश पवार यांनी दिली. अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर यांनी समन्वयन केले. विशाल शिंदे, अनिल काळोखे, सलमा शेख, अक्षय शिंदे, यांनी परिश्रम घेतले.