बारामतीत महिलांची चारचाकी रॅली उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत महिलांची चारचाकी रॅली उत्साहात
बारामतीत महिलांची चारचाकी रॅली उत्साहात

बारामतीत महिलांची चारचाकी रॅली उत्साहात

sakal_logo
By

बारामती, ता. १ : भगिनी मंडळ व महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह यांच्यावतीने बारामतीत ‘महिलांच्या चारचाकी रॅली’चे आयोजन केले होते. महिला दिनानिमित्ताने ‘महिला सक्षमीकरण व एक पाऊल स्वावलंबनाकडे’ या उपक्रमांतर्गत प्रशिक्षित महिलांची चारचाकी गाड्यांची रॅली व मार्गदर्शन कार्यक्रमाचे नुकताच पार पडला.
सातव हायस्कूल येथून रॅली सुरुवात झालेली रॅली रिंग रोड, सम्यक चौक, पेन्सिल चौक, इंदापूर चौक, कारभारी सर्कल ते सातव हायस्कूल, या मार्गावर सुमारे ५० महिलांनी रॅलीत सहभाग घेतला.
याप्रसंगी डीवायएसपी वाणी, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, माजी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा आरती सातव, वाहन निरीक्षक प्रियांका सस्ते, हर्षदा खारतोडे, प्रियांका कुदळे, प्रज्ञा ओमासे, सुनीता शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी केसकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. डॉ. रेवती संत यांनी महिलांना सूचना दिल्या.
दरम्यान, आरी वर्क, साडीला गोंडे लावणे, अशा उपक्रमात सहभाग नोंदविणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच बारामतीचा अवधूत शिंदे याचाही अल्ट्रा मॅन किताब मिळवल्याबद्दल याप्रसंगी सन्मान करण्यात आला. मृदुल देशपांडे, पल्लवी भुते यांनी सूत्रसंचालन केले.