बारामतीत २ दिवसांत ९० वाहनांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत २ दिवसांत 
९० वाहनांवर कारवाई
बारामतीत २ दिवसांत ९० वाहनांवर कारवाई

बारामतीत २ दिवसांत ९० वाहनांवर कारवाई

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : शहरातील विविध रस्त्यांवर होणाऱ्या अस्ताव्यस्त पार्किंगच्या विरोधात शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून शुक्रवारपासून (ता. २) कडक कारवाईस प्रारंभ झाला आहे.
शुक्रवारी (ता. २) पहिल्याच दिवशी रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या ४० वाहनांवर; तर शनिवारी (ता. ३) ४०, अशा प्रकारे दोन दिवसांत तब्बल ९० वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली.
पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातूर यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत फिरून कारवाई केली. अनेक ठिकाणी पार्किंगला बंदी असतानाही चार चाकी वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
या शिवाय विविध चौकामध्ये कार्यरत वाहतूक पोलिसांना अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनीही कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे या मोहिमेचे समन्वयन करीत आहेत. रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनावर वाहतूक अधिनियम कलम १२२, ११७ प्रमाणे कारवाई केली असून, भा.दं.वि. कलम २८३ प्रमाणे चार खटलेही दाखल केले आहेत.
दरम्यान, सर्वच वाहनचालकांनी वाहतुकीला अडथळा होईल किंवा नो पार्किंग क्षेत्रात वाहने पार्क केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. जेथे पार्किंगची सुविधा आहे, अशाच ठिकाणी वाहने लावण्याचे आवाहन पोलिसांनी केले.