बारामतीत लाकडाच्या वखारीस आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत लाकडाच्या वखारीस आग
बारामतीत लाकडाच्या वखारीस आग

बारामतीत लाकडाच्या वखारीस आग

sakal_logo
By

बारामती, ता. ४ ः शहरातील कसब्यातील एका लाकडाच्या वखारीस मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे या वखारीचे मोठे नुकसान झाले. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी बारामती नगरपालिकेचे तसेच एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण केले.
त्या पाठोपाठ माळेगाव कारखान्याचीही गाडी आली. एक तासांच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीमध्ये वखारीचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मध्यरात्रीची वेळ असल्याने नागरिक झोपेत असतानाच अचानक आग भडकल्यानंतर स्थानिकांची पळापळ झाली. भारत रतन सिंग पटेल यांची ही लाकडाची वखार असून यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक रहिवाशांनीच सुरवातीला आग विझविण्याचा प्रयत्न केला. बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव व मुख्याधिकारी महेश रोकडे घटनास्थळी धावून गेले व त्यांनी सर्वांना मदत केली.