Thur, Sept 28, 2023

बारामतीतील चोरीप्रकरणी
आरोपीला पेणमधून अटक
बारामतीतील चोरीप्रकरणी आरोपीला पेणमधून अटक
Published on : 5 June 2023, 4:09 am
बारामती, ता. ५ : टँकर चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा तालुका पोलिसांनी छडा लावला असून, हनीफखान मुक्तारखान पठाण (वय ४२, रा. चांदापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला पेण (जि. रायगड) येथून ताब्यात घेत अटक केली, जीपीएस सिस्टिम्स बंद करूनही पोलिसांनी कौशल्याने या टँकरचा तपास केला.
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आदित्य मनोजकुमार जगताप (रा. पणदरे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्याकडील टॅंकर (क्र. एमएच १० डब्ल्यू ७४७४) चोरीला गेला होता. सीसीटीव्हीमधून पठाण यानेच हा टँकर चोरल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय लेंडवे, सहायक फौजदार अनिल ओमासे, दत्ता मदने, संतोष मखरे यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास केला जात होता. त्यातून ते पेण येथे पोहोचले. तेथून त्यांनी पठाण याला ताब्यात घेत टॅंकर हस्तगत केला.