Wed, October 4, 2023

बारामतीतील तिघांवर
मारहाणप्रकरणी गुन्हा
बारामतीतील तिघांवर मारहाणप्रकरणी गुन्हा
Published on : 6 June 2023, 3:05 am
बारामती, ता. ६ : शहरातील कसबा भागातील साठेनगर परिसरात परप्रांतीय कामगारांना विटांनी मारहाण करत गंभीर जखमी करणाऱ्या तिघांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तुषार मारुती सोनवणे, सूरज पडाळे (रा. आमराई, बारामती) व धीरज पडकर (रा. आंबेडकर पुतळ्यामागे, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी दशरथ नामदेव कोळेकर यांनी फिर्याद दिली. या घटनेत अबू कलाम मुलाणी व मोहन रिचू मुजालदे हे दोघे जखमी झाले. या घटनेत मुजालदे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अतिक्रमण काढताना या कामगारांना ही मारहाण झाली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.