
Baramati Crime: बारामतीत चोरांचा सुळसुळाट; भरदिवसा घरफोडी, लाखोंचे दागिने चोरीला
बारामती: शहरातील सायली हिल परिसरात भरदिवसा घरफोडी करत चोरट्यांनी ५ लाख ६६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात संतोष राघू बरळ यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे येथील मएसो विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांची सायली हिल गणेश मंदिराच्या मागे तीन मजली इमारत आहे.
उन्हाळी सुटीमुळे त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती. फिर्यादी हे घराच्या लोखंडी दरवाजाला कुलूप लावून शाळेत गेले होते. ते घरी आले असताना घरात चोरी झाल्याचे त्यांना दिसले. लोखंडी कपाटातील लॉकर तोडण्यात आले होते.
यामध्ये साडेचार तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, सव्वातोळ्याची सोनसाखळी, अडीच तोळ्याचे गंठण, तीन तोळ्यांच्या अंगठ्या, दीड तोळ्याच्या दोन अंगठ्या, अर्ध्या तोळ्याची अंगठी, साडेआठ ग्रॅमचे कानातील झुबे, १८ ग्रॅमचे अन्य सोन्याचे दागिने, असा एकूण ५ लाख ६६०हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.