बारामतीत कॅफे चालकावर गुन्हा

बारामतीत कॅफे चालकावर गुन्हा

बारामती, ता. ५ शहरातील विद्या कॉर्नरमधील कॅफे ग्राऊंड अप या कॅफेवर तालुका पोलिसांनी कारवाई केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकांत मिळावा या उद्देशाने पडदे लावून तयार केलेल्या जागेत अल्पवयीन मुले मुली अश्लिल चाळे करताना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कॅफेचालक सुहास तानाजी कदम व व्यवस्थापक मयूर बाळू कदम या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. बारामती तालुका पोलिसांसह निर्भया पथक उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने ही संयुक्त कारवाई केली.
दरम्यान, पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी कॅफेमधील पार्टीशन काढून टाकण्याबाबत कॅफेचालकांना नोटीस बजावल्या आहेत. नियमबाह्य पध्दतीने काम करणाऱ्या कॅफेचालकांचे परवाने रद्द करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल पोलिस पाठविणार असल्याचे प्रभाकर मोरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com