विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी सप्ताह
विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी सप्ताह

विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी सप्ताह

sakal_logo
By

बारामती, ता. १८ : येथील विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी दिनाचे औचित्य साधून ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान हिंदी सप्ताहाचे आयोजन केले होते.
नवीन शैक्षणिक धोरण विचारात घेता हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये एकांकिका सादरीकरण, कथाकथन, निबंधलेखन, सॉफ्ट बोर्ड डेकोरेशन अशा स्पर्धा झाल्या. या वेळी हिंदी भाषेतील नोकरी व व्यवसायाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
टेलिफिल्म निर्मितीमध्ये हिंदी भाषेच्या माध्यमातून नोकरी व व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. या सप्ताहाचे आयोजन शिक्षक स्वाती मोटे, संगीता पालीवाल, स्वाती मडके, महादेव रेवडे हिंदी विभागातील सर्व शिक्षकांनी केले. विद्यालयाच्या प्राचार्या जॉयसी जोसेफ यांनी मार्गदर्शन केले.