बारामतीत डॉक्टरावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत डॉक्टरावर गुन्हा दाखल
बारामतीत डॉक्टरावर गुन्हा दाखल

बारामतीत डॉक्टरावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

बारामती, ता. १९ ः नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी हलगर्जीपणा दाखविल्याने बारामती शहर पोलिसांनी डॉ. तुषार रामचंद्र गदादे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

बारामती डॉ. गदादे यांच्या रुग्णालयात शुक्रवार (ता.२२) डिसेंबर २०२२ रोजी प्रसूतीदरम्यान एका नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नातेवाइकांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर चौकशी समिती नियुक्त केली होती. या मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी अहवाल दिला होता. डॉक्टरांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका या अहवालात ठेवल्यानंतर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण मोरे यांनी फिर्याद दिली. यासंबंधी यापूर्वी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद शहर पोलिस ठाण्यात होती.

प्रसूतीदरम्यान डॉक्टर उपस्थित असते तर बाळाचा मृत्यू झाला नसता, अशी तक्रार केली होती. त्यानंतर समितीकडे अहवाल मागितला होता. चौकशी समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी या प्रकरणाची चौकशी करत ३० ऑगस्ट रोजी अहवाल दिला. भारतीय दंड विधान ३०४ अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे.