बारामतीच्या एम्समध्ये
चौदावी राष्ट्रीय परिषद

बारामतीच्या एम्समध्ये चौदावी राष्ट्रीय परिषद

Published on

बारामती, ता. ३१ ः येथील अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एम्स) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने बारामतीत नुकतीच चौदावी राष्ट्रीय परिषद झाली.
‘व्हॅल्यू ड्रिव्हन अँड टेक्नो-पॉवर्ड गव्हर्नन्स इन सायन्स, सोशियोइकॉनॉमिक अँड मॅनेजमेंट’ हा या परिषदेचा विषय होता. एम्सचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य सोनिक शाह (पंदारकर) अध्यक्षस्थानी होते. एम्सचे संचालक डॉ. एम. ए. लाहोरी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी ‘उद्योजकता, सामाजिक आर्थिक व्यवस्थापन आणि नैतिक मूल्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले.

श्रायबर डायनामिक्सचे व्यवस्थापक श्रीकांत कुलकर्णी यांनी ‘अन्न गुणवत्ता जतन आणि कालबाह्यता यांचे परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. कर्नाटकचे डॉ. के. बी. रामप्पा यांनी ‘शोधनिबंध, केस स्टडी, आणि प्रबंध लिखाणासाठी आवश्यक कुशलता’ या विषयावर मार्गदर्शन केले. शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे सुरेश बी. उमप यांनी ‘तरुणांमध्ये उद्योजकता विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सचिव मिलिंद वाघोलीकर, सचिव डॉ. हर्षवर्धन व्होरा, संचालक डॉ. एम. ए. लाहोरी यांचे मार्गदर्शन या परिषदेसाठी मिळाले. संयोजिका डॉ. संध्या खटावकर यांनी नियोजन केले. देशभरातील महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक राज्यांतून ३३ शोधनिबंध प्राप्त झाले. यातील निवडक ३१ शोधनिबंधांचे प्रकाशन आयएसबीएन प्रमाणित जर्नलमध्ये केले गेले. सारांश प्रदर्शन डॉ. डी. पी. मोरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com