महावितरणचे २०४ कोटींचे बारामतीत वसुलीचे उद्दिष्ट

महावितरणचे २०४ कोटींचे 
बारामतीत वसुलीचे उद्दिष्ट
Published on

बारामती, ता. १८ : आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी महावितरणच्या बारामती परिमंडळात आगामी १३ दिवसांत २०४ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट महावितरणने निश्चित केले आहे. प्रत्येक अभियंता, लाइनमन यांना हे उद्दिष्ट विभागून देण्यात आले आहे. वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल तातडीने भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे. बारामती परिमंडळात लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे ११२ कोटींची थकबाकी, चालू महिन्याची मागणी २५७.५३ कोटी असे मिळून मार्च महिन्यात बारामती परिमंडळास ३६९.४६ कोटी वसुलीचे उद्दिष्ट सांघिक कार्यालयाकडून देण्यात आले आहे. १८ दिवसांत १६६ कोटी रुपये वसूल झाले असून, हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४४.९३ टक्के आहे. दैनंदिन वसुलीवर लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय पथके तयार केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com