मेदनकरवाडी येथे प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेदनकरवाडी येथे प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन
मेदनकरवाडी येथे प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन

मेदनकरवाडी येथे प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन

sakal_logo
By

चाकण, ता. ६ : मेदनकरवाडी (ता. खेड) गावच्या विकासात दिवंगत माजी सरपंच रामदास मेदनकर यांचे योगदान मोठे आहे. गावच्या विकासासाठी त्यांनी संघर्ष केला, असे मत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केले.
मेदनकरवाडी (ता. खेड) गावचे आदर्श माजी सरपंच दिवंगत रामदास मेदनकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रामदास मेदनकर यांच्या नावाने उभारलेल्या प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन आमदार मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
आमदार मोहिते म्हणाले, ‘‘दिवंगत रामदास मेदनकर यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात खेडचे दिवंगत माजी आमदार नारायण पवार यांच्या काळापासून केली होती. गावचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मेदनकर व मी एकावेळी नारायण पवार यांचे कार्यकर्ते म्हणून काम करत होतो. कोरोनाच्या काळात त्यांचे निधन झाले ही गावासाठी तसेच खेड तालुक्यासाठी हानी होती. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण मांजरे, भाजपचे गुलाब खांडेभराड, खेड तालुका भाजपचे अध्यक्ष शांताराम भोसले यांनी विचार व्यक्त केले.
या प्रसंगी पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस सुदर्शन चौधरी, माजी सरपंच प्रियांका मेदनकर, शरद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. संकेत मेदनकर, माजी उपसरपंच सुरेखा मेदनकर, मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, उपसरपंच सलोनी मेदनकर, दत्तात्रेय भुजबळ, महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर, संभाजी मेदनकर, जयश्री भुजबळ, मंगल मेदनकर, सुमन खरात, रवींद्र मेदनकर, संदीप मेदनकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b01982 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top