
आंबेठाण चौकामध्ये वाहतूक कोंडी
चाकण, ता. १३ : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकात अस्ताव्यस्त वाहनांमुळे आज दिवसभर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीने प्रवासी, कामगार त्रस्त झाले होते.
चाकण (ता. खेड) येथील आंबेठाण चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होते. वाहतूक विभागाचे उपायुक्त आनंद भोईटे व पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, आंबेठाण चौकात वाहतूक नियंत्रक दिवा बंद आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. चाकण औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहने, कामगारांच्या बसेस व इतर वाहने आंबेठाण चौकात पुणे-नाशिक महामार्गावर मिळतात. तसेच पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक, चाकण शहरातून झित्राई मळा, दावडमळा येथे जाणारी वाहतूक त्यामुळे वाहनांची संख्या अधिक असते. चौकात वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे वाहन नेण्याच्या प्रयत्नात काही जण वाहने चालवत असल्याने चौकात वाहनांच्या अस्ताव्यस्तपणामुळे वाहतूक कोंडी होते. चौकातील काही अतिक्रमणे काढून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात यावी अशी मागणी नागरिकांची आहे. पण अतिक्रमणे काढण्याकडे नगरपरिषद अजिबात लक्ष देत नाही. चौकातील ओढ्यावर काही धनदांडग्यांनी अतिक्रमणे करून ओढा बुजवून टाकला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02001 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..