चाकणला भैरवनाथ महाराजांचा उद्या उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला भैरवनाथ महाराजांचा उद्या उत्सव
चाकणला भैरवनाथ महाराजांचा उद्या उत्सव

चाकणला भैरवनाथ महाराजांचा उद्या उत्सव

sakal_logo
By

चाकण, ता. १४ : भैरवनाथ महाराजांचा सोमवारी (ता. १६) उत्सव साजरा होत आहे. उत्सवानिमित्ताने बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष किसन गोरे, सचिव व्यंकटेश सोरटे यांनी दिली.
चाकण (ता. खेड) येथील बैलगाड्याच्या शर्यतीसाठी रोख चार लाख ६६ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. बैलगाड्यांच्या शर्यतीत फायनलसाठी सहा दुचाकी यांत बुलेट, स्प्लेंडर यांसह फ्रीज, दूरचित्रवाणी संच, कुलर, जुंपता गाडा, मानाची चांदीची गदा आदी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. घाटाचे उद्‍घाटन आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते होणार आहे. उत्सवानिमित्ताने पहाटे पाच वाजता देवाला पूजा, अभिषेक, सकाळी नऊ वाजता हारतुरे, मांडवडहाळे मिरवणूक, सायंकाळी सहा वाजता देवाची पालखी मिरवणूक, सायंकाळी सात ते दहा वाजता बाजार समितीच्या बाजार आवारात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. बैलगाड्याच्या शर्यती १६ व १७ रोजी होणार आहेत. नवीन घाट रोहकल रस्त्यावर आहे. मातीवरील कुस्त्यांचा आखाडा १८ रोजी सायंकाळी चार ते सात या वेळेत होणार आहे. यात्रेसाठी अध्यक्ष किसन गोरे, व्यंकटेश सोरटे, महेश शेवकरी, अर्जुन धाडगे, भरत गोरे, लक्ष्मण वाघ, अनिल देशमुख, शांताराम गोरे, अशोक परदेशी, हरिभाऊ गोरे, रमेश गोरे, सुरेश बनकर, अतुल कांडगे, सुनील शेलार आदी व इतर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. यात्रेचे आयोजन चाकण ग्रामस्थांनी केले आहे. उत्सवानिमित्ताने भैरवनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02003 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top