चाकणला रस्त्यावरच भरतोय बाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला रस्त्यावरच भरतोय बाजार
चाकणला रस्त्यावरच भरतोय बाजार

चाकणला रस्त्यावरच भरतोय बाजार

sakal_logo
By

चाकण, ता. १२ : जुन्या पुणे-नाशिक मार्गावर भाजीपाला व्यावसायिक पथारी मांडून बसतात, त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो आहे. या मार्गाने कंटेनर, ट्रेलर, ट्रक आदी अवजड वाहतूक होते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. अतिक्रमण केलेल्या पथारीवाल्यांना हटवावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
चाकण, (ता. खेड) येथील पुणे-नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. ती कमी करण्यासाठी वाहतूक विभागाचे उपायुक्त आनंद भोईटे, पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या पुणे-नाशिक मार्गावर एकेरी वाहतूक केली. या मार्गावरील भाजी मंडई हटविली होती, परंतु ती पुन्हा बसू लागली आहे. माणिक चौकात शिक्रापूर बाजूकडून पुणे तसेच मुंबई, तळेगाव बाजूकडे अवजड वाहने मोठ्या प्रमाणात जातात. माणिक चौकातून पुणे, तळेगाव, मुंबई मार्गाकडे जाण्यासाठी कंटेनर, ट्रेलर माणिक चौकाजवळ वळताना पथारीवाले यांच्या अतिक्रमणामुळे वळण घेण्यासाठी मोठ्या वाहनांना अडथळा येतो. तसेच ही वाहने वळताना पथारीवाल्यांच्या अंगावर जाऊन अपघात होऊ शकतो असा धोका निर्माण झाल्याने पथारीवाले, व्यावसायिक यांनी अतिक्रमणे काढावीत अशी मागणी आहे. याकडे चाकण नगरपरिषद, नाणेकरवाडी ग्रामपंचायत लक्ष देत नाही असा नागरिकांचा आरोप आहे.
चाकण नगरपरिषदेच्या वतीने पथारीवाल्यांवर तात्पुरती कारवाई केली जाते. या मार्गांवर रविवार व गुरुवार या दोन दिवशी मोठा बाजार भरतो. या बाजारात कामगारांची व इतर नागरिकांची हजारोच्या संख्येने गर्दी असते. अगोदरच मार्ग पंचवीस फूट रुंदीचा त्यात अतिक्रमणे झाल्याने तो अरुंद झाला आहे. त्यातून वाहने कशी चालवायची हा प्रश्न चालकांना पडला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02030 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top