चक्रेश्वर मंदिराचा रस्ता अडवू नये : मोहिते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चक्रेश्वर मंदिराचा रस्ता अडवू नये : मोहिते
चक्रेश्वर मंदिराचा रस्ता अडवू नये : मोहिते

चक्रेश्वर मंदिराचा रस्ता अडवू नये : मोहिते

sakal_logo
By

चाकण, ता. २९ : येथील चक्रेश्वर मंदिर हे पुरातन आहे. मंदिरासाठी रस्ता पुरातन काळापासून आहे. तो कोणीही दगड टाकून अडविन्याचा प्रयत्न करू नये. हा रस्ता चाळीस फूट रुंदीचा आहे. तो खुला करण्यात येईल व रस्त्याचे काम लवकर करण्यात येईल, अशी ग्वाही माहिती आमदार दिलीप मोहिते यांनी दिली.
चाकण (ता. खेड) येथील पुरातन चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठे दगड टाकून रस्ता अडविन्याचा प्रयत्न शेजारी जमीन असलेल्या नागरिकांनी केला आहे. हा रस्ता आमच्या जागेतून जातो, असे म्हणणे त्यांचे आहे. त्यामुळे रस्ता दुसरीकडून करावा, अशी त्यांची मागणी आहे. चाकण व बारा वाड्यांतील नागरिकांचे अंत्यविधी, दशक्रिया विधी कार्यक्रम या ठिकाणी होतात, त्यामुळे मंदिरात दररोज मोठी गर्दी असते. परंतु काही लोकांनी या रस्त्याच्या जागेबाबत मालकी हक्क सांगून मोठे दगड टाकले आहेत. याबाबत चक्रेश्वर मंदिर येथील एका शोकसभा कार्यक्रमावेळी अनेक नागरिक, भाविकांनी चक्रेश्वर मंदिराच्या रस्त्याबाबत मोहिते यांच्यापुढे तक्रारी मांडल्या.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड, देवस्थानचे लक्ष्मण वाघ यांनी रस्त्याचा प्रश्न मांडला. यावेळी रामदास धनवटे, नितीन गोरे, राम गोरे, लक्ष्मण जाधव, किरण झिंजूरके, तुकाराम कांडगे व इतर अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील नाणेकर यांनी केले.

रस्त्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. हा रस्ता लवकरच रस्ता होणार आहे. या रस्त्यावर बांधलेली कमान मंदिराच्या जागेच्या हद्दीत बांधली आहे. ज्यावेळी कमान बांधली त्यावेळी त्यांनी विरोध का केला नाही. आता कमान काढली जाणार नाही. संबंधित जमीन मालकांशी तसेच प्रशासनाशी चर्चा करून प्रश्न सोडविला जाईल.
- दिलीप मोहिते, आमदार
03674

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02084 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..