शेलपिंपळगावात कृषी संजीवनी मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेलपिंपळगावात कृषी संजीवनी मोहीम
शेलपिंपळगावात कृषी संजीवनी मोहीम

शेलपिंपळगावात कृषी संजीवनी मोहीम

sakal_logo
By

चाकण, ता. ३ : शेलपिंपळगाव (ता.खेड) येथे कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. यात चाकणचे मंडल कृषी अधिकारी गोविंद नाळे यांनी शेतकऱ्यांना शेतीच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

खरीप हंगामातील सोयाबीन उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, पेरणीची खोली, बियाण्याची मात्रा, तणनाशकाचा वापर, खत बचत तसेच कृषिक अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करणे, रुंद वरंभा सरी लागवड तंत्रज्ञान (बीबीएफ) आदींबाबत नाळे यांनी उपयुक्त माहिती दिली. शेलपिंपळगाव येथे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुदानित लाभार्थी भरत दौंडकर यांचा ट्रॅक्टरची तपासणी कृषी पर्यवेक्षक श्रीकांत राखुंडे यांनी केली. यावेळी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थी गणेश मोहिते, चंद्रकांत मोहिते यांचे शेतात फळपीक जांभुळ कलम व फुलपीक गुलाब लागवड सरपंच विद्या मोहिते, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सयाजी मोहिते, युवा कार्यकर्ते श्रीनाथ लांडे यांच्या हस्ते कलमांची लागवड करण्यात आली. तसेच सोयाबीन पीक बीजप्रक्रिया व प्रात्यक्षिक शेतकरी तानाजी पोतले यांच्या शेतात घेण्यात आली.
कृषी संजीवनी मोहिममध्ये कृषी सहायक मेघा कांबळे, वैशाली खडतरे, जयश्री पाडेकर, विशाल जगताप, मंगेश किर्वे, कृषिमित्र अंकुश दौंडकर, माणिक साबळे, प्रगतिशील शेतकरी मिलिंद मोहिते, शंकर मोहिते, सत्यवान मोहिते, सीताराम जरे, भगवान गाडे आदी सहभागी झाले होते.

03689

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02092 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..