खड्ड्‍यांमुळे तळेगाव मार्गाला तळ्याचे स्वरूप पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप चाकण -तळेगाव मार्गांवर पाण्याची तळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्‍यांमुळे तळेगाव मार्गाला तळ्याचे स्वरूप
पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप
चाकण -तळेगाव मार्गांवर पाण्याची तळी
खड्ड्‍यांमुळे तळेगाव मार्गाला तळ्याचे स्वरूप पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप चाकण -तळेगाव मार्गांवर पाण्याची तळी

खड्ड्‍यांमुळे तळेगाव मार्गाला तळ्याचे स्वरूप पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप चाकण -तळेगाव मार्गांवर पाण्याची तळी

sakal_logo
By

चाकण, ता. १४ : येथील (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील चाकण-तळेगाव राज्यमार्गावर लॉरियल कंपनीजवळ, खालुंब्रे तसेच राणूबाई मळ्याजवळ पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी सुमारे तीन फुटांचे खड्डे पडल्याने त्यातून दुचाकी, वाहने कशी चालवायची? हा प्रश्न कामगारांना, नागरिकांना पडला आहे. खड्ड्यांमुळे अधूनमधून अपघात होत आहेत.

चाकण-तळेगाव वर्दळीच्या मार्गांवर अनेक ठिकाणी खडी, डांबर निखळले आहे. मार्गांवर पावसाचे पाणी साचल्याने व ते पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने तळ्याचे स्वरूप रस्त्याला आले आहे. त्यात दुचाकीस्वार घसरून पडत आहेत व जखमी होते आहेत. या खड्ड्यात अवजड वाहने कंटेनर, ट्रेलर, ट्रक, टेम्पो, रिक्षा, कार आदी जोरात आदळतात. यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होते. या खड्ड्यात दुचाकी गेल्यास दुचाकी घसरते. यामुळे दुचाकीस्वार जखमी होत इजा होत आहे. हे खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी नागरिक, कामगारांकडून होत आहे.

तळेगाव मार्गांवरील खड्डे बुजविण्यासाठी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौरे यांच्या प्रयत्नामुळे मुरूम टाकून खड्डे तात्पुरते बुजविण्यात आले. पण या मार्गांवर अवजड वाहनांची वर्दळ असते. औद्योगिक वसाहतीतील महत्वाचा मार्ग असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. मार्गावरील खड्डे दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. सध्या हा मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. त्यामुळे या मार्गांचे त्वरित काम व्हावे, अशी मागणी प्रवासी, कामगार, उद्योजक, नागरिक यांची आहे.

ठेकेदारांकडून निकृष्ट काम
चाकण-तळेगाव मार्गाचे काम ज्या ठेकेदार, रस्ते कंपनीने केले ते निकृष्ट दर्जाचे हे असा आरोप नागरिक, कामगारांचा आहे. त्या कंपनीने, ठेकेदाराने काम पुन्हा करून द्यावे, अशी मागणी आहे. मागील वर्षी आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रयत्नाने खड्डे बुजविले होते. मात्र तरीही पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था झाली.

03729

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02113 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..