
चाकणला दहा टन वाटण्याची आवक
चाकण, ता. १९ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात बेळगाव येथून दहा टनांवर हिरव्या वाटण्याची आवक झाली. घाऊक बाजारात प्रति किलोला ऐशी (८०)रुपये भाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, व्यापारी रवींद्र बोराटे, आबा गोरे, लहू कोळेकर यांनी दिली.
या बाजारात गुजरात, कर्नाटक, राजस्थान आंध्रप्रदेश, तेलंगना, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथून मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक होते. बाजारात खरेदीसाठी कोकण, पिंपरी-चिंचवड, मुंबई व जिल्ह्यातून व्यापारी येतात. त्यामुळे उठाव चांगला असतो. हिरवा वाटाणा दहा टनावर बाजारात विक्रीसाठी आला होता. एका किलोला ऐशी रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात एका किलोला शंभर ते १२०रुपये भाव मिळत आहे. बाजारात हिरव्या मिरचीचे भाव सध्या स्थिर आहेत. हिरव्या मिरचीला प्रति किलोला ३० ते ३५ रुपये भाव मिळाला. राज्यात आठवडाभरा पासून पाऊस असला तरी फळभाज्या व पालेभाज्यांची आवक मात्र सुरू आहे. भाव कमी झाल्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला आहे. परराज्यातील पावसाळी वाटाण्याची आवक प्रथमच सुरू झाल्याने भाव अधिक असले तरी मागणी मात्र अधिक आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
03736
Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02117 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..