खासदार राऊतांवरील कारवाईचा चाकण येथे शिवसेनेतर्फे निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार राऊतांवरील कारवाईचा चाकण येथे शिवसेनेतर्फे निषेध
खासदार राऊतांवरील कारवाईचा चाकण येथे शिवसेनेतर्फे निषेध

खासदार राऊतांवरील कारवाईचा चाकण येथे शिवसेनेतर्फे निषेध

sakal_logo
By

चाकण, ता. २ : खेड तालुका शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (ता.२) माणिक चौकात चाकण-शिक्रापूर राज्यमार्गांवर खासदार राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचा तीव्र निषेध करून ईडीचा तसेच राऊत यांच्या अटकेचा निषेध घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड, खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, प्रकाश वाडेकर, उत्तम गोगावले, नितीन गोरे, विजया शिंदे, लक्ष्मण जाधव, नंदा कड यांनी भाषणे करून ईडीच्या कारवाईचा व भाजपचा निषेध करून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कडवट टीका केली व राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला.
या आंदोलनावेळी शिवाजी वर्पे, राहुल गोरे, विजया जाधव, कविता करपे, किरण गवारे, धीरज केळकर, पांडुरंग गोरे, साहेबराव कड, दत्ता जाधव, सुभाष मांडेकर, केशव अरगडे, रामहरी आवटे, गणेश नाणेकर, माऊली कड, सतीश मंडलिक, शेखर पिंगळे, स्वामी कानपिळे, संतोष शिळवणे, अनिल मिसर, संपत गावडे, सुनील बोबले आदी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

03776

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02138 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..